Thursday, March 27, 2025
Homeजळगावभुसावळात चाकूचा धाक दाखवून दुकानदारांस लुटले !

भुसावळात चाकूचा धाक दाखवून दुकानदारांस लुटले !

भुसावळात चाकूचा धाक दाखवून दुकानदारांस लुटले !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील आठवडे बाजारात सिंडिकेट बँक समोरील सट्टा दुकानामध्ये सात आठ अज्ञात इसमांनी बेकायदा दादागिरी करीत दुकानात अनधिकृतपणे घुसून सिनेमा स्टाईल दुकानाचे शटर बंद करून चाकूचा धाक दाखवून अंदाजे ७० हजार रुपये बळजबरीने लुटल्याची घटना दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. सदरील दुकान मालक रंगा पवार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान गेल्या २ दिवसांपूर्वी आठवडे बाजारातील ए.आर.जैन या दुकानांची कुलूप तोडण्याचा प्रयत्न शनिवार रोजी झाला होता. यासंदर्भात दुकान मालक अंजिक्य रमेश जैन यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची माहिती दिली परंतु पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी व्यापारी वर्तुळातून व नागरीकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या