Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाभुसावळात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तिघांना अटक !

भुसावळात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तिघांना अटक !

भुसावळात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तिघांना अटक !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरात रेल्वे शाळेच्या परिसरात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तिघांवर शहर पोलिसांनी रविवार रोजी रात्री साडेअकरा वाजता कारवाई केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी दीपक रमेश म्याद्रे (४०), पंकज रेवाराम कहार (१९) आणि एक अल्पवयीन मुलगा असे तीनजण दुचाकीवर हातात तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी रात्री साडेअकरा वाजता तिघांवर कारवाई करीत तलवार आणि दुचाकी जप्त केली आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या