Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाभुसावळात धारदार तलवारीसह तिघांना अटक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळात धारदार तलवारीसह तिघांना अटक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळात धारदार तलवारीसह तिघांना अटक
गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इंदिरा नगर भागातील त्रिकूटाकडून सहा हजार रुपये किंमतीच्या चार धारदार तलवारी जप्त केल्या.
सदरची कारवाई मंगळवारी, 1 एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी तीन संशयीतांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जळगाव गुन्हे शाखेला इंदिरा नगर भागातील तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पथकाने छापेमारी करीत भरत यादव खंडारे (19, रा. इंदिरा नगर, भुसावळ), सागर अनिल संघवी (20, रा. इंदिरा नगर भुसावळ) व सागर राजू यादव (25, रा. इंदिरा नगर, भुसावळ) यांना अटक करीत त्यांच्याकडील सहा हजार रुपये किंमतीच्या चार तलवारी जप्त केल्या आहेत .

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार गजानन देशमुख, हवालदार गोपाल गव्हाळे, हवालदार संघपाल तायडे, कॉन्स्टेबल सचिन पोळ आदींच्या पथकाने केली असून या कारवाई मुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्ती मध्ये खळबळ उडाली आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या