भुसावळात पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अंगावर अॅसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
सदर घटनेबाबत शनीवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक ही करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भुसावळ शहरातील एका भागात ३५ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. सरकारी नोकरी करून त्या आपला उदरनिर्वाह करीत आहे.
१ मार्च ते १५ मार्च या कालावधीत संशयित आरोपी अब्दुल रहीम शेख , वय २७ रा. स्टेट कॉलनी, भुसावळ याने महिलेला संबंध ठेवण्याची मागणी केली. व अश्लिल चाळे करत विनयभंग केला आहे .
संबंधित आरोपीने पैशांची मागणी करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार असहय् झाल्याने महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार संशति आरोपी अब्दुल रहीम शेख , वय २७ याच्यावर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोहेकॉ सुपडा पाटील हे करीत आहे.