भुसावळात पूर्ववैमनस्यातून खून ; आठवड्याभरापासून मृतदेह खड्ड्यात
भुसावळ – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील यावल रोडवरील भिल वाडी परीसरात राहणारे मुकेश भालेराव या तरुणास पूर्ववैमनस्यातून सात ते आठ इसमांनी घरात प्रवेश करून हातात बंदुकी व चाकू घेवून
खून केल्याची घटना ता.१३ रोजी दोन वाजेच्या सुमारास घडली असून मयताचा मृतदेह आठवड्याभरापासून खड्ड्यात बुजण्यात आला होता.

होळीच्या दिवशी रात्री अकरा वाजेपासून मुकेश भालेराव घरातून गायब असल्याची माहिती सुरेखा भालेराव यांनी शोभाबई युवराज गुडचर (बहिण) कळविली.यासंदर्भात सुरेखा मुकेश भालेराव ही दोन ते तीन वेळा शहर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेली असता पोलिसांनी टाळाटाळ केली. मात्र गेले चार दिवसांपासून पोलिसांनी सुरेखा मुकेश भालेराव यांना दररोज पोलीस स्टेशनला चौकशी कामी बोलाविले.व तपास चक्र सुरू केले.
सदरील प्रकरण अंगलट येणार असल्याने सुरेखा

भालेराव यांनी बहिणीस कळविले की, मुकेशला सात ते आठ इसमांनी ता.१३ रोजी हातात पाच बंदुका व चाकू घेवून प्रवेश केला व मुकेशच्या पत्नीस घरात डांबून ठेवून मुकेश घरामध्येच संपविले.यानंतर मुकेशचा मृतदेह सक्त ते आठ इसमांनी गादी सकट उचलून संशयित मनोज राखुंडे यांच्या घराच्या पाठीमागील तापी नदी खोऱ्यात नेऊन पाच फुटाचा मोठा खड्डया खोदून मुकेशची मांडी मारून मातीने दाबण्यात आला.

सदरील घटनेची माहिती मुकेशची बहीण यांनी ता.२१ रोजी दुपारी बारा वाजेला पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत मुकेशच्या मृतदेह खड्यातून सायंकाळी सहा वाजेला वर काढला व ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केसर सेंटर मध्ये शवविच्छेदन साठी नेला.रात्री अंदाजे दहा वाजेपर्यत शवविच्छेदन करण्यात आले.यानंतर पोलिसांनी संशयित मनोज मारुती राखुंडे यास ताब्यात घेतले असता त्यांने अनिल
मारुती राखुंडे,विनोद मारुती राखुंडे,शुभम अनिल राखुंडे,आदित्य सुनील राखुंडे,सुरेखा मुकेश भालेराव तसेच एक अनोळखी महिलेची नावे सांगितली. पोलिसांनी मनोज राखुंडे,सुरेखा मुकेश भालेराव तसेच एक अनोळखी महिलेस ताब्यात घेण्यात आले.