Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाभुसावळात भावाने मारला बहिणीच्या घरात डल्ला : पोलिसांनी केली अटक

भुसावळात भावाने मारला बहिणीच्या घरात डल्ला : पोलिसांनी केली अटक

भुसावळात भावाने मारला बहिणीच्या घरात डल्ला : पोलिसांनी केली अटक

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पाटील मळा भागातील फळ विक्रेत्याकडे चोरट्याने भर दिवसा घरफोडी करुन २८ हजारांच्या रोकडसह १ लाख ४४ हजारांचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तपास लावून फिर्यादीच्या पत्नीच्या चुलत भावालाच या गुन्ह्यात अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भुसावळात चोरी झाल्याचा हा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान समोर आला होता. तर भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिक धास्तावले होते. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासात घरफोडीची उकल करत संशयित रिजवान फकीरा बागवान (३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यास अटक केली. संशयित आरोपीकडून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंजोबा मंदिराजवळील पाटीलवाडा भागात राहणाऱ्या इब्राहिम इलियास बागवान यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने ते कुटुंबातील सदस्यांसह गावातच सोमवारी दुपारी लग्नाला गेले होते. ही संधी साधून संशयित रिजवान बागवानने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चंदीचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड असा १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. तक्रारदाराच्या पत्नीचा संशयित आरोपी हा दूरच्या नात्याने भाऊ असून त्याचे बागवान यांच्याकडे येणे-जाणे होते. पोलिसांच्या तपासात व सीसीटीव्हीतही ही बाब स्पष्ट होताच संशय बळावला व आरोपीला पकडताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठचे पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, एएसआय हसमत अली सय्यद, हवालदार विजय बळीराम नेरकर, हवालदार रमण काशीनाथ गुरळकर, हवालदार महेश एकनाथ चौधरी, कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह, कॉन्स्टेबल राहुल विनायक वानखेडे, कॉन्स्टेबल अमर सुरेश अदाळे, कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या