Monday, April 28, 2025
Homeजळगावभुसावळात युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपातांची शक्यता !

भुसावळात युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपातांची शक्यता !

भुसावळात युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपातांची शक्यता !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील दगडी पुलाखाली नाल्यामध्ये एक अनोळखी इसमांचा मृतदेह आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.हा प्रकार १० रोजी उघडकीस आला असून सायंकाळी सहा वाजेला पोलिसांना माहिती मिळताच धाव घेतली.मृतदेहांची ओळख पटली नसून हा घातपातांची शक्यता असल्याचे नाकारता येत नाही.
दगडी पुलाजवळ अवैध दारूची विक्री सकाळच्या सहा वाजेपासून तर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत सुरू असते.यामुळे अनेक युवकांची चहेल पेहल असते.रात्री उशिरा पर्यत तडीराम पुलांच्या बाजूला बसत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच परिसरात काही अंतरावर कोचिंग क्लासेस सुरू असल्याने नेहमी या तडीरामांचा त्रास विद्यार्थाना होत असतो.अनेक वेळा तक्रार केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जाते.कुठल्यानं कुठल्या करणोत्सव तडीरामांचे नेहमी वाद सुरू असतात.कदाचित सोबतच असणारे काही युवकांचा रात्री वाद झाल्याने यात युवकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरील प्रकरण अंगलट येण्यार असल्याने त्या युवकांनी मृतदेह दगडी पुलांच्या खाली नाल्यामध्ये टाकून फरारी झाले असावे.घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी धाव घेत नाल्यातून युवकांचा मृतदेह वर काढून ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरला शवविच्छेदनांसाठी पोहचविण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या