भुसावळात रात्रीच्या सुमारास भीषण आग : चारचाकीसह सामान जळून खाक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील लक्ष्मी गॅरेजमध्ये गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागल्याने त्यात एक चार चाकी व काही सामान जळून खाक झाले. आगीने रौद्र रूप धारण केले होते.
नगरपालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.ही आग विझवली गेली नसती तर त्या ठिकाणी पार्क केलेल्या अन्य वाहनांनाही आग लागली असती. आग पसरली असती तर समोरच पेट्रोल पंप होता. त्यामुळे पेट्रोल पंपाला आग लागू शकली असती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅरेजमधील सर्व सामान जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.