Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाभुसावळात शासकीय कामात आणला अडथळा : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळात शासकीय कामात आणला अडथळा : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळात शासकीय कामात आणला अडथळा : ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील सुदगाव वॉटर पंप हाऊस येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील सुदगाव वॉटर पंप हाऊस येथे प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होते. या वेळी कार्यालयाच्या गेट समोर संघर्ष समिती पिंप्री सेकमचे अध्यक्ष रमाकांत प्रल्हाद चौधरी यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दीपनगर येथील उपमुख्य अभियंता यांच्यासह अधिकाऱ्यांचा रस्ता अडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच मुख्य अभियंता, प्रकल्प अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या नोटिसकडे दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी दीपनगर येथील उपमुख्य अभियंता संतोष प्रल्हाद वाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलनकर्ते रमाकांत प्रल्हाद चौधरी, रवींद्रसिंग कुलदीपसिंग सोहेल, गणेश सुखदेव तायडे, सुभाष रामकृष्ण पाटील, गणेश डोंगर तायडे, जालिंदर पाटील, विशाल विजय पाटील (सर्व रा. पिंप्री सेकम, ता. भुसावळ) यांच्याविरोधात १२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउनि संजय कंकरे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या