भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट उपविभागीय पुरस्काराने सन्मानित
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट उपविभागीय अधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
पुरस्काराबाबत एकूण वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले शासकीय महसूल वसुली, भूसंपादन विविध अपील केसेस, हद्दपार आदेश प्रकरणे, जमीन विषयक प्रकरणे, विविध दाखले वाटप ,ऑफिस आणि लोकसभा निवडणूक कार्यक्रम यातील कामगिरी विचारात घेण्यात आली. भुसावळ नगरपालिका आणि वरणगाव नगरपालिका प्रशासक म्हणून प्रभावी कामकाज तसेच विभागातील तीनही तालुक्यात शासनाच्या विविध योजना आणि विविध सेवा नागरिकांना विविध मुदतीत अचूक रीतीने आणि कार्यक्षमपणे राबविण्यामध्ये योगदान दिले. तसेच तीनही तालुक्यातील तहसीलदार आणि तलाठी मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्या संयुक्त योगदानामुळे भुसावळ विभागाला हा पुरस्कार मिळाला आहे.