Wednesday, March 26, 2025
Homeजळगावभुसावळ जंक्शन मध्ये सलग चौथ्या वर्षी करवाढीपासून दिलासा.

भुसावळ जंक्शन मध्ये सलग चौथ्या वर्षी करवाढीपासून दिलासा.

भुसावळ जंक्शन मध्ये सलग चौथ्या वर्षी करवाढीपासून दिलासा.

सौर उर्जा प्रकल्प, स्मार्ट स्कूल, बेघर निवारा पेपरलेस कामासाठी ही केली तरतुद.

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ नगर पालिकेवरील प्रशासकिय राजवटीत यंदा सलग चौथ्यांदा प्रशासकांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.
भुसावळ जंक्शन असलेल्या भुसावळ पालिकेने यंदा ३७१ कोटी ७५ लाख ६२ हजार २३३ रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजूरी दिली आहे .
पालिकेने या वर्षी सुद्धा कोणत्याही स्वरुपाची करवाढ केली नाही. २०२३-२४ साठी २४९ कोटी २७ लाख ८२ हजार ८५३ रुपयांचे अंदाजपत्रक होते.

ते सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २३ कोटी ५५ लाख ६९ हजार ३४६ रुपयांनी वाढून २७२ कोटी ८३ लाख रुपयांवर पोहोचले होते
तर यात ९८ कोटी ९२ लाख रुपयांची वाढ झाली आहे

पालिकेने यंदाही ४८ लाख १७ हजार ९२८ रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही नगरोत्थान, अमृत आदी प्रकल्प वगळता कोणत्याही प्रकारची नाविण्यपूर्ण योजना नसल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.
नविन अर्थ संकल्पात पालिकेने सौर उर्जा प्रकल्प, स्मार्ट स्कूल, नागरि बेघर निवार, पेपरलेस कामकाज या नाविन्यपूर्ण कामांसाठी प्रथमच तरतुद केली आहे.
पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात प्रथमच भुयारी गटारीसाठी ५० कोटी, सौर उर्जा प्रकल्पासाठी ५० लाख, चौक सुशोभीकरणासाठी ५० लाख, पालिकेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी ३० लाख, नागरि बेघर निवारा योजनेसाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यासोबतच पालिकेच्या शाळा स्मार्ट स्कूलमध्ये अपग्रेड करण्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

शहरातील शासकिय योजनांतील दलितवस्ती सुधारणा, सर्व साधारण रस्ते, वैशिष्टपूर्ण कामे योजना, विशेष रस्ता अनुदान, अमृत टप्पा एक, अमृत टप्पा दोन, पंतप्रधान आवास योजना, भुयारी गटारी योजना, सौर उर्जा प्रकल्प,१४वा वित्त आयोग, माझी वसुंधरा आदी २२ योजनांतून किमान १९४ कोटी ५३ लाख ४५ हजार रुपयांचे अनुदान मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पालिकेला आगामी आर्थिक वर्षात सहाय्यक अनुदान, माता बालसंगोपन, मुद्रांक शुल्क, व्यवसाय व कर, मोटार वाहन, करमणूक आदींसह तब्बल १४ हेडमधून ६१ कोटी ४० लाख १५ हजार ४३ रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. भांडवली उत्पन्नातील वाढीमुळे शहरवासीयांना काही नवीन सुविधा पालिकेला देता येणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या