भुसावळ नगरपरिषदेत दिवंगत कर्मचारी यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नगर पालिकेत नोकरी असतांना कर्मचारी मयत झाले होते त्यांच्या कुटुंबावर मोठी आपत्ती आली होती बऱ्याच महिन्या पासुन सदर अनुकंपा नोकरीचे प्रकरणे प्रलंबित होती.
जिल्हाधिकारी जळगांव यांच्या सिफारशी नुसार दिवंगत कर्मचारी विजयसिंग शंकरसिंग राजपूत यांचे वारस हर्षा विजयसिंग राजपूत ,
प्रमोद दगडू बोरोले यांचे वारस जैमिन प्रमोद बोरोले , व धनराज गिरधर वारके यांचे वारस प्रसाद धनराज वारके यांना जिल्हाधिकारी सो, यांच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर मा. मुख्याधिकारी राजेंद्र फातले साहेब, यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आलेली आहे.
त्यावेळेस स्थापत्य अभियंता रितेश बच्छाव, आस्थापना प्रमुख वैभव पवार, उपमुख्यधिकारी शेख परवेज अहमद उपस्थित होते.