Thursday, March 27, 2025
Homeजळगावभुसावळ पालिकेचा दुर्लक्षित कारभार ;दिवसा पथदिवे सुरू नागरीकांकडून कर स्वरूपात वीजबीलाची वसुली.

भुसावळ पालिकेचा दुर्लक्षित कारभार ;दिवसा पथदिवे सुरू नागरीकांकडून कर स्वरूपात वीजबीलाची वसुली.

भुसावळ पालिकेचा दुर्लक्षित कारभार…

दिवसा पथदिवे सुरू नागरीकांकडून कर स्वरूपात वीजबीलाची वसुली.

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील बहुतांश भागात रात्रंदिवस पथदिवे सुरू राहत असल्याचा आर्थिक भुर्दंड भुसावळकरांवर पडत असून, महावितरण च्यावतीने विजेचा अतिरिक्त अधिभार त्या-त्या प्रभागातील नागरिकांवर आकारला जात असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकाराकडे नगरपालीकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत असतानाच शहरातील माजी नगरसेवक राजकिय पदाधिकारी सामाजीक सेवा करणारे ही झोपेत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरील एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नपा प्रशासनाने झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. पथदिवे देखभाल दुरुस्तीच्या बदल्यात कंत्राटदारांना पलिके कडून झोननिहाय लाखो रुपये अदा केले जातात. अर्थात, पथदिव्यांवर महिन्याकाठी भरगच्च खर्च होत असला तरी शहरातील विविध मुख्य मार्गावर अद्यापही नादुरुस्त पथदिव्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील बंद पथदिव्यांच्या संदर्भात नपाच्या विद्युत विभागाने सविस्तर माहिती ठेवणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळेच कंत्राटदारांचे फावत असून, नादुरुस्त पथदिव्यांची १५-१५ दिवसांनंतरही दुरुस्ती केली जात नसल्याची परिस्थिती आहे.
शहरात एलईडी’च्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिवे बिघडल्यामुळे पथदिव्यांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने अनेक मार्गावर दिसुन येत असतांना पालिकेने नियुक्त केलेले झोननिहाय कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही भागात पथदिवे चोवीस तास सुरू राहतात. त्यावर होणारी विजेची अनावश्यक उधळपट्टी टाळण्यासाठी प्रशासन उपाययोजना करतील का, याकडे सुज्ञ भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.

महावितरण कंपनीने विद्युत तार उपलब्ध करून दिल्यास त्यावर नपाला टायमर लावता येते. प्रभागातील कोणत्या भागात विजेचा किती वापर झाला, याची महावितरणकडे नोंद राहते. ‘टायमर’अभावी पथदिवे दिवसा सुरू राहत असल्याने वीज देयक वाटप करताना त्या-त्या परिसरातील वीज ग्राहकांवर अतिरिक्त अधिभार लादून त्या बदल्यात वीज देयकाचे पैसे वसूल केल्या जात असल्याची माहिती आहे.अर्थात, नपाच्या भोंगळ कारभारामुळे हा आर्थिक भुर्दंड भुसावळकरांना सहन करावा लागत आहे. यावर मुख्याधिकारी राजेंद्र फातले ठोस तोडगा काढतील का, असा सवाल सर्वसामान्य शहरातील नागरीक उपस्थित करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या