भुसावळ बारसे – राखुंडे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी नितीन पथरोडचा मृत्यू !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष राखुंडे व बांधकाम व्यावसायिक सुनील राखुंडे यांचे २९ मे रोजी दुहेरी हत्याकांड झाले होते. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी नितीन पथरोड याचे नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनिल राखुंडे हे कारने २९ मे रोजी जळगाव रोडने शहरात येत असतांना सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या वर संशयित आरोपींनी बेछुट गोळीबार केला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपींना नंदुरबार येथील कारागृहात हलविण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी नितीन पथरोड याची प्रकृती काही दिवसांपासून खालावल्याने त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान काल रात्रीच्या सुमारास नितीन पथरोड याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.