भुसावळ येथील उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी पंटरसह एसीबीच्या जाळ्यात !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्व संध्येला भुसावळ शहरातून मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून, भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे वय ३९ यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खाजगी पंटरासह पकडले आहे.१९ नोव्हेंबर रोजी त्यांचे सोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता.
सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून 50 हजार रुपयांची मागणी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी 22 नोंव्हेवर रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती.सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम पन्नास हजार रुपयां ची मागणी करून तडजोड अंती तीस हजार रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.२२ नोव्हेंबर रोजी यातील दुसरा आरोप किरण माधव सुर्यवंशी, वय ३७ ,धंदा – मजुरी, हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यास तीस हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ठिकाणी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.सदरील कार्यवाही ही श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली, योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव यांच्या अचूक नियोजन व पाठपुराव्यामुळे सापळा रचून तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि जळगांव, बाळू मराठे,राकेश दुसाने यांच्या पथकाने केली आहे.या कारवाई मुळे भुसावळ सह परिसरात खळबळ उडाली आहे .