Monday, March 17, 2025
Homeजळगावभुसावळ येथील जयमातृभुमी चौकात लक्षीपुजन उत्साहात साजरे

भुसावळ येथील जयमातृभुमी चौकात लक्षीपुजन उत्साहात साजरे

भुसावळ येथील जयमातृभुमी चौकात लक्षीपुजन उत्साहात साजरे

आ. संजय सावकारे यांची होती उपस्थिती

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दिवाळी सण हा उत्साहाचा व मांगल्याचा असतो सर्वांच्या जीवनात सुख शांती आनंद आणि समृद्धी लाभो याकरिता हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो.

भुसावळ येथील जयमातृभुमी चौकात माजी नगरसेवक किरण कोलते व महिला मंडळ तसेच सर्व जय मातृभूमी मंडळाचे कार्यकर्ते यांनी लक्षीपुजन आयोजित केले होते. आमदार संजय सावकारे, रजनीताई सावकारे व उद्योगपती मनोज बियाणी यांच्या उपस्थितीत लक्षीपुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षी प्रमाणे यंदा हि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. यावेळी परीसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. पुजन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी संतोष चौधरी , किरण महाजन, गुड्डू शेठ अग्रवाल,विनोद चौधरी,अशोक चौधरी , पवन अग्रवाल , अॅड निर्मल राजेंद्र दायमा, कैलास सोनार रवी पाटील ,जितेंद्र वारके, तुषार पाटील, सचिन ब-हाटे, गब्बर बऱ्हाटे , प्रियेश भंगाळे,तेजस झांबरे,चंदन ढाके,बाळा पाटील, आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या