भुसावळ येथे अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करणार
पोलीस निरीक्षक राहुल वाघ
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे काही अल्पवयीन मुले जे अठरा वर्षाच्या आतील आहे ते वाहन चालवत आहे
त्यामुळे अपघात घडत आहेत त्याचप्रमाणे काही अल्पवयीन मुले मोटरसायकलला फटाक्यांच्या आवाजाचे सायलेन्सर लावत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे

काल मातृभूमी चौकामध्ये अशाच प्रकारे तीन मुलांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना सतरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे .
तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये