भुसावळ येथे कैलास शेलोडे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सुंदरकांड चे पठण
भुसावळ येथील समाजसेवक कैलास शेलोडे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सुंदर कांड पठण कार्यक्रम श्रीराम नगर येथे संपन्न झाला
सुंदरकांड पठण कार्यक्रम आस्था परिवारातर्फे भजन सम्राट श्री सुनील लाहोटी, सह गायक एवं झांज वादक श्री सुनील भादुपोता व श्री महेश भालेराव यांनी सादर केला .
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संजय मंत्री व दीपचंद आगीवाल हे होते .
सध्याच्या काळात वाढदिवसानिमित्त विविध पार्ट्यांचे आयोजन केले जाते परंतु आध्यात्मिक कार्यक्रम सादर करून लोकांना आध्यात्मिक ज्ञान देऊन हा आगळावेगळा वाढदिवस शेलोडे परिवाराने साजरा केला आहे . याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .
या सुंदरकांड पठन कार्यक्रमाचा दोनशेच्या वर भाविकांनी लाभ घेतला आहे