भुसावळ येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिग्गजांनी दिली उपस्थिती
अनेकांना प्राप्त झाली रोजगाराची संधी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील संतोषी माता हॉल येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला .
या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येकाला नोकरीची संधी मिळते, परंतु आपल्यामध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही.
सध्याची मानसिकता काय आहे, तर नोकरी आहे तर छोकरी आहे, पण ही मानसिकता बदलली पाहिजे. तर असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की ‘मी नोकरी करणार नाही, मात्र मालक होवून नोकरी करणाऱ्यांना कामाला लावेल’ अशी मानसिकता राहणार नाही, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माणसाने चोरी करायची लाज ठेवावी, बाकी कोणत्याच कामाची लाज बाळगू नये. आपल्या हातात येईल ते काम आपण केले पाहिजे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची दालने खुली झाली आहे. जे काम मिळेल ते काम आपण केले पाहिजे.

जीवनात चढ-उतार येतात, पण मिळेल त्या संधीचे सोने आपण केले पाहिजे.
या रोजगार मेळाव्यात अनेक तरुणांनी विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल केले. काही तरुणांना तात्काळ नोकरीची ऑफर मिळाली, तर काहींना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.
या मेळाव्याला तरूणांनी ही चांगला प्रतिसाद दिला आहे .
या मेळाव्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे असे आयोजकांनी याप्रसंगी सांगितले.