दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात आरोपींना अटक!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथे दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सात आरोपींना हत्यारे व इतर साहित्या सह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ येथे राष्ट्रीय महामार्गाजवळ अलीशान वॉटर पार्कच्या मागे सात जण गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती .
या अनुषंगाने पथक त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी आरोपी शेख इमरान शेख रसूल , शेख मुजमिल, अरबाज शेख , सोयब शेख खाटीक, विकी ठाकूर, राहुल बेंडवाल , जितेंद्र मेलावंस हे सात जण संशयित रित्या उभे होते . त्यांच्या अंग झडतीत त्यांच्याकडून गावठी कट्टा ,मिरची पूड , चापर,चार तलवारी , राऊंड व दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , भुसावळचे उपभागीयय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय राहुल वाघ , पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी ,पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी , पोलीस नाईक सोपान पाटील ,पोलीस शिपाई प्रशांत सोनार , भूषण चौधरी , प्रशांत पाटील ,योगेश माळी ,राहुल वानखेडे व इतर यांनी केली आहे.अधिक तपास पोउनि मंगेश जाधव करीत आहेत .