भुसावळ येथे पेन्शनर असोसिएशन ची सभा संपन्न
भुसावळ येथे अखिल भारतीय रेल्वे पेन्शनर असो सिएशन ची सभा उत्साहात संपन्न झाली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस ओ बऱ्हाटे होते .
तर प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष विभास मुळे , महासचिव रणजित घोष , उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील , सी आर भालेराव ,तोरण सिंग आदी उपस्थित होते .
याप्रसंगी असोसिएशनच्या सभासदांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला .
यावेळी महासचिव रंजीत घोष यांनी सांगितले की पेन्शनर यांनी आपल्या परिवारातील नावे जन्म तारखे सह रेकॉर्डला लावणे जरुरीचे आहे .
यावेळी विभास मुळे यांनी सांगितले की कर्म हेच महत्त्वाचे असल्याने प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने सेवा देणे असोसिएशनचे कर्तव्य आहे .
रेल्वे पेन्शनर यांनी कोणत्याही समस्या असल्यास आमच्याकडे यावे आम्ही त्यातून मार्ग निघेल आतापर्यंत अनेक पेन्शनरांनी याचा लाभ घेतला आहे योग्य माहीतीव सहकार्य मिळेलअसे आवाहन यावेळी करण्यात आले .
कार्यक्रमात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली .