टाळमृदंगाचा गजर करीत केले आंदोलन
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात हिंदू देवदेवतांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेल्या शरदचंद्र पवारांनी त्यांच्या विधानाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असा आरोप करत भुसावळ येथे १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराच्या आवारात बसुन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन करीत तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे आमदार संजय सावकारे म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार देव देवी देवतांचा अपमान केला जात आहे शरदचंद्र पवार जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार हिंदू देवी देवतांचा अपमान केला जात आहे आता ज्ञानेश महाराज यांच्याकडून अपमान करण्यात आला हिंदू धर्मात जन्म घेऊन हे हिंदू देवतांचा अपमान करीत आहे एवढा अपमान मुस्लिम बांधवांनी कधी हिंदू देवतांचा केलेला नाही तेवढे हे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हिंदू देवी देवतांचा अपमान करीत आहेत यांना जर हिंदू धर्म प्रसन्न असेल तर यांनी हिंदू धर्म सोडून द्यावा असा उपरोधक ओला देखील संदेश सावकार यांनी लागला आहे जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज श्रीरामांचा तसेच श्रीकृष्णांचा अपमान केला आहे दुसरीकडे राहुल गांधी आम्ही आरक्षण संपवू असे सांगतात आरक्षणाचे खापर मात्र भाजपाच्या नावावर फोडतात भाजपा सरकार चांगले काम करीत आहे मात्र भाजपा सरकारला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहे असा आरोप देखील आमदार संजय सावकारे यांनी यावेळी केला महाविकास आघाडीचा चेहरा जनतेसमोर येत आहे एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाराज यांनी संताबद्दल अपशब्द बोलले तरी देखील शरद चंद्र पवार त्यावर एकही शब्द बोलले नाही याचा आम्ही निषेध करतो असे आमदार सावकारे यांनी यावेळी म्हटले आहे.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतिश सपकाळे,माजी शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे,माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, राजेंद्र चौधरी ,गोलू पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, देवा वाणी, नितीन धांडे, प्रशांत पाटील , राहुल तायडे, गौरव आवटे, महिला आघाडीच्या शैलेजा पाटील, बापू महाजन, बोधराज चौधरी, गिरीश महाजन आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.