भुसावळ येथे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते “एक रेशन कार्ड एक साडी” योजनेचा शुभारंभ
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
योजनेच्या शुभारंभ प्रसंगी लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.राज्यातील २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथे नुकताच संपन्न झाला.या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.या योजने अंतर्गत राज्यातील २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिका धारक लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री संजय सावकारे यांनी कार्यक्रमान बोलतांना दिली आहे.