Monday, March 24, 2025
Homeजळगावभुसावळ येथे संविधान आर्मीच्या वतीने प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढुन निषेध

भुसावळ येथे संविधान आर्मीच्या वतीने प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढुन निषेध

भुसावळ येथे संविधान आर्मीच्या वतीने प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढुन निषेध

शहरातील खड्ड्याबाबत केले आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी ) संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली १२सष्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता विविध दहा संघटनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छञपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच ताजोद्दीनबाबा यांना फुलाची चादर चढवून शहरातील खड्ड्या बाबत शव वाहिनीसह प्रेत याञा काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा समारोप नाहाटा चौफुलीवर करण्यात आला. या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

 


शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासुन प्रेत याञा आंदोलनाला सुरुवात होऊन बस स्थानक परीसरात पडलेल्या खड्ड्याचे पुजन करुन लोखंडी पुल, पांडुरंग टाॅकीज , स्वर्गीय मोटूमल सोबराज चांदवाणी चौक, अष्टभुजा देवी मंदिर ते नाहाटा काॅलेज चौफुलीपर्यंत प्रेत याञा काढून नाहाटा काॅलेज चौफुलीवर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
भुसावळ शहरातील खड्डेमय वातावरण निर्माण झाले आहे शहरातील खड्ड्यांमधून गणरायाचे आगमन झाले ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. मागच्या वर्षी देखील हिच अवस्था होती. गेल्या पंधरा वर्षापासून हे सुरू आहे. गणरायाचे विसर्जन सुद्धा खड्ड्यामधूनच होणार आहे आमदार संजय सावकारे यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण संपूर्ण शहरातील खड्ड्याची बस स्टैंड वर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून खड्ड्याचे पूजन करून जागोजागी विसावा घेत खड्ड्याचे पूजन करत आम्ही नाहाटा काॅलेज चौफुलीपर्यंत आलो आहोत. असे संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी म्हटले आहे. आमदार संजय सावकारे आम्हाला धार्मिकता कट्टरता शिकवत आहेत. घराघरात प्रत्येक माणूस धार्मिक कट्टर आहे. परंतु आम्हाला धार्मिक कट्टरता नको आहे आम्हाला नफरत नाही रस्ते पाहिजे भुसावळ शहर स्वच्छ सुंदर पाहिजे. शहरात शांती पाहिजे, रोजगार पाहिजे, पिण्यासाठी शुद्ध पाणी पाहिजे. रस्ते पाहिजे येत्या पाच दिवसात आमदार संजय सावकारे यांनी खड्ड्याचा प्रश्न सोडविला पाहिजे असे जगन सोनवणे यांनी म्हटले आहे .तुम्ही विधानसभेत जाऊन नापास झाला आहात म्हणून राजीनामा दिला पाहिजे. सावकारे यांनी पंधरा वर्षात काहीच कामे केले नाहीत म्हणून आम्हाला हा संदेश द्यावा लागला असे हि सोनवणे यांनी म्हटले आहे.

 


भुसावळकरांना पंधरा पंधरा दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही वरणगाव कंडारी, साकेगावसह संपूर्ण तालुक्याला पिण्याचे पाणी मिळत नाही ही भयानक अवस्था आहे .तुमचे नगरसेवक ठेकेदार हे या ठिकाणी शहरात निकृष्ट दर्जाची कामे करत आहे.तुमच्या कारकीर्द मध्ये निकृष्ट कामे झाली आहेत. एकही रस्ता पाच वर्ष का टिकला नाही सहा सहा महिन्याने रस्ते टिकत नाही. शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आमदारांच्या दलालांनाच फक्त कामे मिळतात ते या ठिकाणी धनवान झाले आहेत ते मलिदा खातात मात्र भुसावळकर जनता दुःखी आहे चंद्राला ग्रहण लागते ते एक दिवस किंवा एक तासात सुटून जाते परंतु भुसावळ शहराच्या विकासाला गेल्या पंधरा वर्षापासून ग्रहण लागले आहे हे ग्रहण सोडविण्यास आमदार संजय सावकारे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत ते धर्माचे राजकारण करतात खड्ड्यामुळे जर एखाद वेळी गणपतीची मूर्ती पडली तर सावकारे तुम्ही कोणाला तोंड दाखवणार असा प्रश्न जगन सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकाला रस्ते स्वच्छ पाणी वीज व स्वच्छ शहर पाहिजे भुसावळ शहराचे प्रश्न घेऊन आम्ही 20 सप्टेंबरला मंत्रालयावर मोर्चा नेऊन रेल रोको आंदोलन करणार असल्याचे जगन सोनवणे यांनी म्हटले आहे आमदार सावकारे पंधरा वर्षात काहीच काम करू शकले नाही मात्र जर मला भुसावळकरांनी संधी दिली तर मीच भुसावळ शहरात चमत्कार करून दाखवेल जर भुसावळकरांचे प्रश्न मी सोडवले नाही तर तुमच्या पायातील पाजत्राने माझ्या डोक्यावर मारा असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या