Thursday, March 27, 2025
Homeगुन्हाभुसावळ रेल्वे आरपीएफच्या सतर्कतेने गांजा तस्कर गजाआड, जीआरपी स्थानकात गुन्हा दाखल !

भुसावळ रेल्वे आरपीएफच्या सतर्कतेने गांजा तस्कर गजाआड, जीआरपी स्थानकात गुन्हा दाखल !

भुसावळ रेल्वे आरपीएफच्या सतर्कतेने गांजा तस्कर गजाआड, जीआरपी स्थानकात गुन्हा दाखल !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी बॅग सर्चीगं मशिनच्या सहाय्याने प्रवाशांच्या बॅगांची तपासणी सुरू असतांना मंगळवार (ता. ८ ) दुपारी १.४० वाजेच्या दरम्यान एका प्रवाशाची बॅग संशयास्पद वाटली त्या अनुशंगाने आरपीएफचे पीआय.पीआर मीणा यांचे मार्गदर्शनात कर्तव्यांत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे जवानाने बॅगची सखोल तपासणी केली असता.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, प्रतिबंधात्मक अमली पदार्थ ४० हजार रू. किंमतीचा ४ कीलो गांजा आढळून आला असुन संशयीतास भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधिर धायकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.भुसावळ रेल्वे स्थानकातील बॅग सर्चिगं मशिनवर नेहमी प्रमाणे आरपीएफ आणि जी आरपीचे कर्मचारी कर्तव्य करीत असतांना मंगळवार ( ता. ८ ) दुपारी १.४० वाजेच्या दरम्यान संशयीत समीर खान जमील खान, वय २५ वर्षे रा. चंदोला (तलवान छपरा ) किराणा स्टोर्स ढाली निमला, अहमदाबाद.याने त्याची बॅग सर्चीगंमशिनमध्ये टाकली असता. कर्तव्यांत असलेल्या एमएसएफ चे रफिक शेख व जी आर पी चे भुषण पाटिल, यांना स्क्रीनवर अलर्ट आला. त्या अनुशंगाने भुसावळ रेल्वे स्थानकातील आरपीएफचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त व पोलिस निरीक्षक पीआर मीणा यांचे अतूल कराळे, व राज्य उत्पादन शुल्क भुसावळचे पो नि सुनिल कपाटे यांचे उपस्थीतीत बॅगची तपासणी करण्यात आली दक्षिण बाजूच्या पॅसेंजरच्या डब्यात बॅग स्कॅनिंग मशीनजवळ उपस्थित असलेल्या पंचायतीद्वारे. बॅगेत खाकी टेपने झाकलेले दोन बंडल आढळून आले. बंडल ओळखून कात्रीने कापून पंचा समक्ष उघडले असता त्यात बिया असलेला आंबट उग्रवस व ओला गांजा आढळून आला. त्याचे वजन दोन पंचांसमोर करून दोन बंडलमध्ये ४० हजार रुकिंमतीचा ४ किलो प्रतिबंधात्मक आमली पदार्थ ओला गांजा आढून आला.

प्रसंगी कार्यवाहीसाठी आरपीएफ भुसावळ रेल्वे स्टेशनचे निरीक्षक पी.आर.मीणा यांनी वरील गांजाच्या जप्ती पंचनाम्यात नमूद केलेल्या तपशिलांसह जीआरपी/भुसावळ यांचे कडे सोपवण्यात आली आहे. या संदर्भात, जीआरपी/भुसावळ द्वारे संशयीत समीर खान जमील खान याचे विरूध्द जी आरपीचे पोलिस निरीक्षक सुधिर धायरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन अमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला असुन पुढील तपास भुसावळ.जीआरपीचे पोलिस निरीक्षक सुधिर धायरकर करीत आहे.आरपीएफ, जीआरपी आणि एमएसएफ कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. अहवाल आदराने पाठवला जातो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या