Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाभुसावळ रेल्वे स्थानकावर आढळले एक पिस्तूलसह ९ जिवंत काडतुसे ; एकाला अटक...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळले एक पिस्तूलसह ९ जिवंत काडतुसे ; एकाला अटक !

भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळले एक पिस्तूलसह ९ जिवंत काडतुसे ; एकाला अटक !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रकाश आकाश मुंडे (वय ३१, रा. परळी, जि. बीड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भुसावळ रेल्वे स्थानकावरील दक्षिणेच्या बाजूला बॅगची तपासणी करत असताना स्कॅनर मशीनमध्ये पिस्तूल आढळले. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता, त्यात एक गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे आढळली.रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना व लोहमार्गचे पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले. काही दिवसांपूर्वीच लगेज स्कॅनरमध्ये तपासणीदरम्यान गांजा आढळला होता व त्यानंतर आता पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या