Thursday, March 27, 2025
Homeभुसावळभुसावळ विधानसभा मतदारसंघात मानवतकर कुटुंबातील उमेदवारीने चुरस वाढणार

भुसावळ विधानसभा मतदारसंघात मानवतकर कुटुंबातील उमेदवारीने चुरस वाढणार

भुसावळ विधानसभा मतदारसंघात मानवतकर कुटुंबातील उमेदवारीने चुरस वाढणार

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लवकरच विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार असून भुसावळ मतदारसंघाकडे जिल्ह्यातील नागरिकांच्या लक्ष लागले आहे . यातच भुसावळ मधील हृदय रोग तज्ञ व प्रसिद्ध डॉक्टर मानवतकर यांच्या परिवारातील उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून उभे राहण्याचा संकेत मिळत असून मानवतकर कुटुंबीयांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे.यापूर्वी डॉक्टर राजेश मानवतकर व त्यांच्या मिसेस डॉ मधु मानवतकर शरद पवार साहेबांना भेटून आले असून त्यावेळी त्यांनी कामाला लागा असे सांगितले होते .

या अनुषंगाने मानवतकर परिवारातील मधु मानवतकर या विधानसभे निवडणुकीसाठी उभे राहतील यात शंका नाही.कारण मागील निवडणुकीत सुद्धा त्यांनी मताधिक्क मिळविले होते परंतु त्या पराभूत झाले होत्या अपक्ष उमेदवार असून सुद्धा त्यांनी राजकीय पक्षांच्या पुढे जावून दोन नंबर वर येण्याची मजल मारली होती .डॉक्टर मानवतकर परिवार २००४ पासून भुसावळ येथे वैद्यकीय सेवा देत असून त्यामुळे त्यांचा परिसरात दांडगा जन संपर्क आहे .तसेच वरणगाव परिसरात सुद्धा त्यांचे लहानपण व शिक्षण झाल्याने त्या परिसरात सुद्धा त्यांचा चांगला परिचय असल्याने त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो .

भुसावळची जागा राष्ट्रवादी पक्षाला सुटल्यास डॉक्टर मानवतकर हे उभे राहतीलच या शंका नाही .तसेच सदरची जागा इतर मित्र पक्षांना गेल्यास एकाच पक्षातील दोन तीन उमेदवार उमेदवारीसाठी तयारी करत आहे .परंतु डॉक्टर मानवतकर यांच्या परिवारातील सदस्याला उमेदवारी मिळाल्यास विद्यमान आमदार संजय सावकारे यांना ते शह देतील या शंका नाही .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या