भुसावळ विधानसभा महायुतीचे उमेदवार संजय सावकारे २८ रोजी नामनिर्देशन पत्र भरणार.
केंद्रीय राज्य मंत्री ना. रक्षा खडसे व ना. गिरीश महाजन यांची राहणार उपस्थिती
भुसावळ (वा) भुसावळ १२ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय वामन सावकारे हे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व केंद्रीय राज्य मंत्री ना. रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ९ वाजता नामनिर्देशन पत्र शक्ती प्रदर्शन करीत दाखल करणार आहे.
शहरातील जामनेर रोडवरील दर्डा भवन येथे केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे व ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ९ वाजता कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालया पासुन प्रांत कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढुन शक्ती प्रदर्शन करीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी व भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी केले आहे यावेळी महाराष्ट्र उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे उपस्थित होते.