भुसावळ शहरातील हत्या प्रकरणी ७ संशयीतांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –
भुसावळ शहरातील जाम मोहल्ला चौकात डी.डी. टी हाऊसवर चहा पिण्यासाठी आलेल्या तेहरीन नाशीर शेख (27) या तरुणाची 10 जानेवारी रोजी सकाळी गोळीबार करून हत्या केली होती.
याप्रकरणी अटकेतील संशयीतांची पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सात संशयीत आरोपींची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे .
शहरातील खडका रोडवरील जाम मोहल्ला चौकातील डी.डी. टी हाऊसवर चहा पिण्यासाठी आलेल्या तेहरीन नासीर शेख (27) याच्यावर शुक्रवार, 10 जानेवारीला सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून खून करण्यात आला होता
पोलिसांनी या प्रकरणी तपास चक्र फिरवुन वेगवेगळ्या ठिकाणांहून सात संशयीतांना अटक केली होती.
त्यांची आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सातही जणांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या सातही जणांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेल्यांमध्ये वसीम मजीद पटेल, सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल, शेख साहील शेख रशिद, शेख मोहंमद अदनान मोहम्मद युनुस उर्फ काल्या शेख युनुस, अब्दुल नबी हनीफ पटेल, सनस नाईन मोहम्मद आसीफ, आबीद असलम पटेल या संशयित आरोपींचा समावेश आहे.