भुसावळ शहरात विमल गुटख्याची सर्रासपणे विक्री !
संबंधित विभागाचे दुर्लक्ष !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वे जंक्शन असल्यामुळे गुन्हेगारी व अवैध धंदे व विमल गुटखा राजरोसपणे सर्रासपणे सुरू आहे ९० % ट्रेन व एसटी बसेस मध्ये सुद्धा सर्रासपणे गुटका विक्री तंबाखूजन्य सिगारेट इत्यादी वस्तू विक्री होत आहे याकडे मात्र संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा संपूर्ण भुसावळ विभागासह जळगाव जिल्ह्यात आहे.
भुसावळ शहरात सर्वत्र ठिकाणी आणि रेल्वे स्टेशन मध्ये व परिसरात तसेच एसटी स्टँड आवारात अवैध्य गुटखा विक्री तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट इत्यादी खुलेआम विक्री करीत आहे याकडे तसेच शहरात गुटखा कोणकोणत्या मार्गाने येत असतो..? कोण कोण विक्री करीत आहे..? यांना कोणाचे आशीर्वाद आहे तसेच संबंधित यंत्रणा यांच्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे का? या अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध अन्न व औषध प्रशासन तसेच भुसावळ पोलीस,रेल्वे पोलिसांनी नियोजनपूर्वक कार्यवाही करून गुटखा विक्री व अवैध धंदे चालकांविरुद्ध कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.रेल्वेत अनेक एक्सप्रेस,सुपरफास्ट,पॅसेंजर ट्रेनमध्ये सुद्धा विमल गुटखा,बेकायदेशीर अवैध विक्री करणारे,फर्स्ट क्लास,सेकंड क्लास, थ्री टायर,स्लीपर जनरल कोच मध्ये बिना तिकीट अनधिकृत पणे प्रवास करून कोणाच्या आशीर्वादाने गुटखा,सिगारेट, व इतर हलक्या कंपनीच्या बोगस वस्तू विक्री करतात असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.