भुसावळ शहर तलाठी व मंडळ अधिकारी यांचा विविध सामाजिक संघटना तर्फे सत्कार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्हा स्तरावर राबवण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून भुसावळ तलाठी व मंडल अधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय येथे भुसावळ मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे व भुसावळ शहर तलाठी पवन नवगाळे यांचा सत्कार पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील भुसावल सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बनचे संचालक कमलेश झवर, माहेश्वरी समाज भुसावळ अध्यक्ष संजय लाहोटी ,अग्रवाल समाजाचे अध्यक्ष अॅड गोकुळ अग्रवाल यांनी केला. भुसावळ शहराचे नाव सुंदर व स्वच्छ कार्यालय जिल्हास्तरावरील पुरस्कार मिळवून भुसावळ शहर स्वच्छ होण्यासाठी प्रेरणादायी असून सर्व जणांनी आपल्या प्रति व आपल्या शहराप्रती घरघर तिरंगा बरोबर एक पेड माँ के लिये अभियान यशस्वी करावे व प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे असे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी यावेळी केले.
प्रत्येक उपस्थितांनी वृक्षारोपण करून ते जगवण्याचा संकल्प केला. सर्कल अधिकारी व तलाठी आप्पा यांनी स्वच्छ व सुंदर कार्यालय याचे श्रेय समस्त कार्यालयातील कर्मचारी कोतवाल रवींद्र धांडे ,दामिनी महाजन, सोनाली कोळी या सर्वांच्या मदतीने शक्य झाले असे प्रतिपादन केले.