भुसावळ शहर पोलिसांनी बॅटरी चोरांना घेतले ताब्यात!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ शहर पोलिस स्थानक हद्दीतील कंडारी येथे ( ता. १३ ) वाहनाची बॅटरी चोरी झाल्याची अज्ञात चोरटयांविरूध्द तक्रार देण्यात आली होती. प्रसंगी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिताफिने घटनेचा तपास करून (ता. १९) बॅटरी सह दोन संशयी ताब्यात घेतले आहे.
कंडारी ता. भुसावळ येथुन ता. ५ ते ६ सप्टेंबर दरम्यान रात्रीचा फायदा घेऊनअज्ञात चोरटयांनी निलेश मुरीलधर मोरे रा. कंडारी यांच्या वाहनाची बॅटरी काढून पोबारा केला होता.प्रकरणी मोरे यांनी बॅटरीची सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने ता. १३ बॅटरी चोरीचा भुसावळ शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाच्या तपासकामी भुसावळ उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद भुसावळ शहर डीबीचे पथक. संदीप पालवे, जाकीर मंसुरी, अब्दुल रज्जाक खान, राहुल भोई, यांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधरे आरोपी मो. आसीब अब्दुल जब्बार (वय २४ )रा. आग वालीचाळ द्वारका नगर भुसावळ, सिकंदर कल्लू तडवी ( वय २० )रा. कवाडे नगर भुसावळ यांचा तपास घेऊन ता. १९ गुन्ह्यात वापरलेल्या रीक्षा व चोरीची बॅटरी सह अटक केली आहे.