भुसावळ शिवारात गौण खनि जाच्या वाहनावर कारवाई
निवडणूकी नंतर महसुल विभाग ॲक्शन मोडवर
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शिवारात गौण खनिजाची वाहतूक सरीस सुरू असल्याची माहिती महसुल विभागास मिळाली होती
या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली
भुसावळ शिवार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी मौजे साकेगाव येथील रहिवाशी संदीप बेनीलाल परदेशी आमचे मालकीचे वाहन क्रमांक एम एच 18 डी 7752 यावर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रफुल कांबळे तलाठी भुसावळ पवन नवगाळे यांच्या पथकाने कार्यवाही करून वाहन तहसील कार्यालयात जमा केले आहे .
विधानसभा निवडणुकीत महसुल प्रशासन अडकलेले असल्याने गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती आता भुसावळ परिसरात महसुल प्रशासन ॲक्शन मोड मध्ये आले असून या प्रकारच्या कारवाई सुरू राहणार असल्याने अवैध रेती व गौण खनिज वाहन धारका मध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे .