भुसावळ स्त्री रोग तज्ञ असोसिएशन व रोटरी रेलसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जाणीव स्पर्शाची कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
बदलापूर कलकत्ता यासारख्या घटना भविष्यात घडू नये याकरिता शालेय मुला-मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत जागृत करण्याच्या हेतूने स्त्री रोग तज्ञ असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांचे संयुक्त विद्यमाने जाणीव स्पर्शाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सुमारे 35 शाळा मधील साधारणत: पंधरा हजार विद्यार्थी

विद्यार्थिनींना पुढील 8दिवसात या कार्यक्रमाद्वारे लाभ मिळणार आहे तसेच शाळांना याबाबत सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रम शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विभागाचे डी वाय एस पी श्री कृष्णांत पिंगळे साहेब , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ ,व शिक्षण विभागाचे धाडी साहेब, संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे, स्त्रीरोग तज्ञ समन्वयक सौ मनीषा दावलभक्त आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन तसेच श्री शारदा पुजनाने झाला .प्रास्ताविक रो .श्रीकांत जोशी प्रकल्प प्रमुख यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना डॉ . मनीषा दावलभक्त यांनी मुलींना *डरना नही और सहना नही* हा मंत्र सांगितला, कुठला टच बॅड असतो तर कुठला गुड हे समजाविले आणि जर कुणी चुकीच्या पद्धतीने असेल तर त्या विरोधात आवाज उठवा पालक शिक्षक यांना सांगा असे सांगितले . क्रुश्नान्त पिंगळे व राहुल वाघ यांनी सुद्धा मुलींना योग्य मार्गदर्शन केले .व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष श्री विशाल शहा
शहरातील मान्यवर स्री तज्ञ डॉक्टर उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री विनोद उबाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प ऊप प्रमुख श्री मिलिंद धर्माधिकारी यांनी केले या उपक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.