मंदिर,मज्जिद धार्मिक स्थळाजवळ मिरवणूक संदर्भात वाद विवाद व्हायला नको..!
रावेर विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या अपेक्षा.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाचे तथा महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा दणदणीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाला त्यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी त्यांची विजयी मिरवणूक यावल शहरातून संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात जल्लोषात काढली या विजयी मिरवणुकीवर बुरुजचौका जवळ, धार्मिक स्थळाजवळ मोठा उत्साह जल्लोष साजरा होत असताना मात्र त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक / विट फेकल्याची घटना घडली.यावल शहरात या एकाच ठिकाणी जयंती,विविध उत्सव,विजयी मिरवणूक जात असताना वाद विवाद का होतात..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासन यांनी शांतता समिती सदस्यांच्या माध्यमातून निर्णय घेऊन ठोस अशी कार्यवाही करावी असे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे.
या घटनेबाबत यावल पोलीस स्टेशनला कोणी तक्रार दिली आहे किंवा नाही..? आणि तक्रार दिली नसली तरी यावल पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल का केला नाही..? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
समाज बांधवांनी जातीय सलोखा,कायदा सुव्यवस्था,शांतता राखून मोठा संयम बाळगला.परंतु वारंवार अशाच घटना घडत असतील तर याबाबतमात्र वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि शांतता समितीत विचार मंथन आत्मचिंतन करणे आवश्यक झाले आहे.
नवनिर्वाचित तरुण तडफदार आमदार अमोल जावळे यांनी धार्मिक,सामाजिक,राजकीय, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जातीय सलोखा,कायदा सुव्यवस्था, शांतता कशी राहील याबाबत संपूर्ण रावेर विधानसभा कार्यक्षेत्रात ठोस असे निर्णय घ्यायला पाहिजे अशी सर्वसाधारण जनहिताची रास्त अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
यासाठी मतदारसंघातील ठीक ठिकाणच्या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शांतता समिती सदस्यांची निवड करताना सर्व जाती धर्मातील सकारात्मक विचार व नि:पक्षपणा असलेल्या तसेच समितीत कोणत्याही एका गटाचा प्रभाव / बहुमत, वर्चस्व नसलेल्या सदस्यांची निवड करणे आवश्यक झाले आहे.शांतता समिती सदस्यांमध्ये काही २ नंबरचे विविध व्यवसाय करणारे आपला वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी उपस्थित राहतात ते जनहिताचा निर्णय घेऊ शकत नसल्याने अशा सदस्यांना तालुका,शहर स्तरावरील शांतता समितीत प्रवेश द्यायला नको. जिल्हास्तरावर शांतता समिती सदस्यांची निवड करताना तालुक्यातून किमान २ समविचारी, जात धर्माबाबत सकारात्मक भूमिका असलेल्या सदस्यांची सर्वानुमते निवड व्हायला पाहिजे अशी सुद्धा चर्चा आहे.
सर्व जाती-धर्माचा जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था,शांतता राखणे कामे जनजागृती करणाऱ्या सर्व माध्यमांना पर्यायी शासकीय यंत्रणेला सहकार्य करणाऱ्या सदस्यांना शांतता समितीत प्राधान्य देणे कामी नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांनी ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी.तसेच यावल शहरात बुरुज चौकात व पुढे धार्मिक स्थळाजवळ असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या गतिरोधकामुळे सर्व स्तरातील नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे,यात म्हसोबा देवस्थानापर्यंत बेशिस्त वाहतूक,
बेशिस्त वाहनांची पार्किंग, मालवाहतुक वाहने,पाणीपुरवठा करणारी वाहने,कचरा संकलन करणारी वाहने,प्रवासी रिक्षा,लोट / हाथ गाडीवाले मनमानी पद्धतीने वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत बेशिस्त पणाने आणि दांडगाईने वारंवार ट्राफिक जाम करीत असतात,याचे उदाहरण द्यायचे झाल्यास शहरातील बारी चौकात प्रत्यक्ष दृश्य बघितल्यास लक्षात येते,रस्त्यावर ठिकठिकाणी भर रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसायिक आपल्या सोयीनुसार उद्योग व्यवसाय करून सर्व प्रकारच्या नागरिकांच्या येण्या – जाण्यास मोठा अडथळा निर्माण करीत आहे,शुक्रवार आठवडे बाजाराच्या दिवशी बुरुज चौकात भर रस्त्यात विक्रेते आपल्या हात गाड्या लावून बिनधास्तपणे आपला व्यवसाय करीत असतात,यात महामार्गा वरून जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांसह प्रवासी वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी भरूच चौकापासून यावल पोलीस स्टेशन पर्यंत मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची मोठी गर्दी होत असते, यामुळे दररोज अनेक वेळा शाब्दिक चकमकी उडत असतात यातून एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना सुद्धा घडू शकते, आणि असे होऊ नये म्हणून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमित व्यवसाय तात्काळ बंद करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.