मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात विविध झाडांच्या बिया देऊन निसर्गास मदत करू या – डॉ.सुरेंद्रसिंग पाटील !
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी महिला वर्गात सर्वात लोकप्रिय असलेला मकर संक्रांत हा सण मकर संक्रांत ते मकर संक्रांति पासून पंधरा दिवस ते एक महिना ओळखीचे मित्रमंडळी नातेवाईक व आपल्या परिसरातील सर्व महिलांना हळदी कुंकू साठी आमंत्रण देऊन खूप उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा केला जातो.
आपल्या घरी आलेल्या महिलांना हळदीकुंकू लावून त्यांना घरात वापरण्याजोगी भेटवस्तू देत साजरा केला जातो. सद्यस्थितीत आपणासहित सजीवांना निरोगी व सुरक्षित आयुष्य हवे आहे सद्यस्थितीत झपाट्याने झाडांची संख्या कमी होऊन जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन निसर्गाचा समतोल नसल्याने आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
पर्यावरणात मोठा बदल होऊन आपले व आपल्याबरोबर पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक पशुपक्षी सर्वांचे जीवन असुरक्षित असल्याने निरोगी व सुरक्षित जीवनासाठी कुठलाही भेदभाव न करणाऱ्या आपणा सर्वांना निरोगी व सुरक्षित जीवनासाठी आवश्यक असलेल्या आपला खरा आपणास कायमस्वरूपी साथ देत असलेला मित्र म्हणजे विविध प्रकारचे दीर्घकाळ टिकणारे वृक्ष फळ फुलांचे वृक्ष होय . यावर्षी हळदी कुंकू करताना आपणा सर्वांना निरोगी व सुरक्षित जीवनासाठी आवश्यक असलेल्या हळदी कुंकू करताना कायमस्वरूपी टिकणारी वृक्षाचे रोप भेट देऊन आपणही स्वतः एक रोप हळदीकुंकू च्या नावाने लावावे व त्याचे संगोपन करावे. म्हणजेच आपण हळदी कुंकू ला दिलेले रोप म्हणजे ही कायमस्वरूपी आपले आठवण राहील

तसेच विविध प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या विविध वृक्षांच्या बिया स्वरूपात द्याव्या म्हणजे आपण स्वतः कुंडीमध्ये अथवा तेलाच्या दुधाच्या पिशव्या मध्ये जसं आपल्याला सोयीनुसार बीजारोपण करून पावसाळा सुरू झाल्यावर अथवा आपल्या सोयीनुसार भूमातेची माफी मागून भूमातेवर तिळगुळ अर्पण करून वृक्ष लागवड करावी. महिलांचा परिपूर्ण सहभाग असल्याने सदरची वृक्ष निश्चितच जगतील कारण पुढील वर्षी येणाऱ्या हळदी कुंकवाला दिलेल्या रोपांविषयी किंवा बिजारोपण करून स्वनिर्मित रोपा विषयी विषय होणारच वृक्ष लागवड कोणी केल्यास संगोपनाचे कार्य महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही . मकर संक्रांतीला तिळगुळ हे ऊर्जा देण्याचे काम करत असते. त्यामुळे महिलांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण होऊन त्याचे संगोपन योग्यरित्या होऊन महिलांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण होण्यास मदत होईल असे पर्यावरण प्रेमी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.
आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत अभियाना बरोबर आदरणीय प्रधानमंत्री जी यांच्याच एक पेड मॉ के नाम संगोपन सहित वृक्षारोपण बिजारोपण करून आपले व आपल्याबरोबर सर्व सजीवांचे निरोगी व सुरक्षित राहण्यासाठी हातभार लावावा. असे आवाहन त्यांनी केले आहे . लोकांबरोबर बिजारोपण द्वारे आपल्या पसंतीचे पर्यावरणास मदत करणारे स्वनिर्मित झाडे लावूया आपल्याबरोबर इतरांनी लावलेली झाडे जगवू या.
हा संदेश पोहचविण्याचे काम महिलांनी करायला पाहिजे .