Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हामतदान केंद्रावर व्हिडीओ करणे पडले महागात : गुन्हा दाखल !

मतदान केंद्रावर व्हिडीओ करणे पडले महागात : गुन्हा दाखल !

मतदान केंद्रावर व्हिडीओ करणे पडले महागात : गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या शिरसोली मतदान केंद्रावर चित्रीकरण (व्हिडीओ शूटिंग) केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शिरसोली येथील मतदान केंद्र क्र. ३०९ येथे व्हिडीओ शूटिंग करणे देवेंद्र विष्णू पाटील (वय २४, रा. शिरसोली प्र.बो.) या तरुणाला महागात पडले आहे. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी पोलिसांकडे लेखी अहवाल सादर केला असून त्यानुसार हवालदार अभिजित सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून राजकीय अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या