Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हामध्यरात्री एकाच परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडले; गुन्हा दाखल!

मध्यरात्री एकाच परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडले; गुन्हा दाखल!

मध्यरात्री एकाच परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडले; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड येथील रहिवासी ऋषीकेश दिलीप येवले (वय २६) हे भडगाव येथे मामाकडे भेटण्यासाठी गेलेल्या असतांना यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. येथून चोरट्यांनी २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. येवले यांच्यासह त्यांच्या परिसरात राहणारे संजय चौधरी यांच्या घरात देखील चोरट्यांनी घरफोडी केली, मात्र त्याठिकाणी काहीही मिळून आले नाही. ही घटना दि. १७ रोजी राम नगरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातील राम नगरात ऋषीकेश येवले हा तरुण वास्तव्यास असून तो टाटा कॅपीटल येथे नोकरीस आहे. पुणे येथे राहत असलेली त्यांची बहिण आल्यामुळे दि. १५ रोजी ते कुटुंबियांसह भडगाव येथे त्यांच्या मामाला भेटण्यासाठी गेले होते. दि. १७ रोजी सकाळी ते घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप आणि कडीकोयंडा तुटलेला दिसला. दरम्यान, येवले यांनी घरात जावून बघितले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. तसेच कपाटातील सामान देखील बाहेर फेकलेला होता. चोरट्यांनी येवले यांच्या आईचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि देवघरात ठेवलेलेल्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या. दरम्यान, ही घटना येवले यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना सांगितली असता, त्यांनी त्यांच्या परिसरात राहणारे संजय चौधरी यांच्या घरात देखील रात्रीच्या वेळी चोरी झाल्याचे सांगितले. मात्र तेथे चोरट्यांना काहीही मिळून न आल्याने रिकाम्या हाती परतावे लागले.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेजची त्यांनी तपासणी केली आहे. याप्रकरणी येवले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या