तालुक्यातील लाचखोर तलाठ्याला अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात महसुल विभागात लाचखोरी वाढली असुन काल जळगाव तालुक्यात महसुल विभागात लाचखोरास अटक झाल्यावर आज मुक्ताईनगर तालुक्यात ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन खाजगी पंटरला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारणांमुळे महसुल विभाग पुन्हा बदनामी च्या प्रकाशात आले आहे .
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, आजोबांच्या पश्चात वडील, काका, आत्या व नातेवाईकांचे ७/१२ उतारा नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या काकोडा येथील तलाठ्यासह दोन खाजगी पं टरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात हे त्यांचे मूळ गाव आहे.
त्या ठिकाणी ११९७ मध्ये त्यांचे आजोबा मयत झाले होते. दरम्यान तेव्हापासून त्यांच्या वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे नावे ७/१२ उताऱ्यावर लावलेले नव्हते. दरम्यान तक्रार यांनी गेल्या ७ ते ८ दिवसांपूर्वी कुन्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे वय-४२ यांच्याशी भेट घेऊन या संदर्भात माहिती सांगितली. दरम्यान तलाठी यांनी सांगितले की, तुम्हाला प्रत्येक वर्षाचे २२० रुपये प्रमाणे ६ हजार रुपये शासकीय फी भरावी लागेल, जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली.
या तक्रारीची पडताळणीसाठी आज पथकाने बुधवारी ८ जानेवारी रोजी सापळा रचून तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय-४२, रा. चिखली ता. मलकापूर जि. बुलढाणा) याला रंगेहात पकडले. यासोबतच त्याचे खाजगी पंटर अरुण शालिग्राम भोलानकार (वय-३२) आणि संतोष प्रकाश उबरकर (वय-२५) दोन्ही रा. कुन्हा ता. मुक्ताईनगर अशा तिघांवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे मुक्ताईनगर तसेच महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे .