महसूल प्रशासनाच्या कारवाईमुळे शेतकरी व ग्रामस्थ आता मोकळा श्वास घेणार..
अतिक्रमीत रस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरू
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महसूल प्रशासनाच्या वतीने भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव व खडके मंडळात किन्ही ते साकरी दोन गावात असलेला शिवरस्ता दोन्ही बाजुकडुन बरेच वर्षापासुन काही शेतकरी यांनी अतिक्रमण करुन बंद करणेत आलेला होता.सदर मोहिमे अर्तंगत मंडळ अधिकरी खडका प्रविण पाटील व मंडळ अधिकारी पिंपळगांव एफ एस खान तलाठी किन्ही तलाठी साकरी यांनी सदर रस्ता ता.२२ रोजी लोकसहभागातुन मोकळा करणेची कार्यवाही केली. त्यामुळे सदर अतिक्रमीत असलेला मौजे किन्ही ते साकरी शिवरस्ता अंदाजे ३ कि.मी. रस्त्याची रुंदी ५.५ मीटर १८ शेतकरी तसेच साकरी ते किन्ही रत्याची लांबी १ कि.मी. रुंदी ४ मीटर शेतकरी संख्या ७४ खातेदार यांना रस्ता मोकळा झाल्याने फायदा झाला.

वरणगांव मंडळात मंडळ अधिकारी श्रीमती रजनी तायडे तलाठी तळवेल व तलाठी ओझरखेडा यांचे पथकाने भुमी अभिलेख कार्यालय भुसावळ चे कर्मचारी यांचे सहाय्याने तळवेल-बोहर्डी शिवरस्ता हा काही शेतकरी बरेच वर्षापासुन अतिक्रमण करुन बंद केलेला होता सदर मोहीमे अर्तंगत सदर रस्ता मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथकांनी सदरचा रस्ता मोकळा केला रस्त्याची लांबी अंदाजे २ कि.मी. रुंदी ४.५० मीटर ८३ शेतकरी खातेदार यांना सदर रस्ता मोकळा केल्याने फायदा झाला तसेच दुसरी कार्यवाही मध्ये तळवेल-वरणगांव शिवरस्ता रस्त्याची लांबी २ कि.मी. रुदी ४.५ मीटर हा देखील रस्ता बरेच वर्षापासुन बंद असल्याने मोहीमे अर्तंगत अतिक्रमण काढुन मोकळा केल्याने ९७ शेतकरी याना रस्ता मोकळा केल्याचा फायदा झाला. तहसिलदार निता लबडे भुसावळ यांनी तालुक्यातील एकुण १० रस्ते मोकळे करण्याचे नियोजन केलेले आहे.