Monday, April 28, 2025
Homeगुन्हामहसूल विभागाच्या पथकाचा पाठलाग : अवैध वाळु वाहतूकीचे डंपर जप्त !

महसूल विभागाच्या पथकाचा पाठलाग : अवैध वाळु वाहतूकीचे डंपर जप्त !

महसूल विभागाच्या पथकाचा पाठलाग : अवैध वाळु वाहतूकीचे डंपर जप्त !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वड्री गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डम्पर महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले. हे डम्पर नदीपात्रात अडकल्याने चालकाने तेथेच सोडून दिले. हे डम्पर जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून तहसील कार्यालयात नेण्यात आले. डम्पर मालकाला दंड ठोठावण्यात आला.डम्पर क्रमांक एमएच १९ सीवाय ८४८१ हे सुशील मोतीलाल पाटील, रा. जळगाव यांच्या मालकीचे आहे. पथकाने चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालक नीलेश मिस्त्री, रा. पाळधी याने वाहन घेऊन पळ काढला. पाठलाग करताना डम्पर खडकाई नदीपात्रात अडकले. त्यामुळे चालकाने वाहन जागेवरच सोडले. पथकाने नंतर डम्पर नदीपात्रातून बाहेर काढून तहसील कार्यालयात आणले.

नदीपात्रात फसलेले डम्पर काढण्याकरिता वड़ी सरपंच अजय भालेरावसह स्थानिक पोलिस पाटलांची मदत महसूल विभागाने घेतली. रात्रभर नदीतून डम्पर काढण्याकरिता मेहनत घेण्यात आली व पहाटे ते नदीतून जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले. ही कारवाई मंडळाधिकारी मीना तडवी, ग्राम महसूल अधिकारी उमेश बाभूळकर, सुनील कुंभार, मिलिंद कुरकुरे, पंढरी अडकमोल, विजय साळवे, शरीफ तडवी, मंडळाधिकारी एम.एच. तडवी, अश्विन दुर्गे, निशांत मोहोड, राजू पारधी, संजय दंडगोल, अतुल घाडघे, समीर तडवी, अरविंद बोरसे यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या