महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान !
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – फैजपूर येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर १००८ श्री पुरुषोत्तमदासजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज फैजपूर शहरातील दिव्यांग बांधव तसेच मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. खंडोबा देवस्थानात शहरातील दिव्यांग बांधव तसेच मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थी यांना खंडेराव देवस्थानचे उत्तराधिकारी पवनदासजी महाराज व भक्तजनांच्या हस्ते यथोचित सन्मान करून भोजन देण्यात आले.
महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांना फैजपूर शहरातील तसेच परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.