महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जागतिक महिला दिनानिमित्त तहसीलदार व इतर महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सन्मानित केले.
यावल दि.८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज जागतिक महिला दिन मोठ्या आपुलकीने साजरा साजरा करीत यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांना शाल,श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना शाल,श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर चुचाळे येथील तलाठी तडवी मॅडम, किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, अधिकारी डॉ.तरन्नूम शेख मॅडम, आरोग्य सेविका भाग्यश्री दिनकर भारंबे,आरोग्य सेविका सुरेखाताई माळी यांना मोठ्या आपुलकीने शाल,श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्यानंतर
नायगाव ग्रामपंचायत उपसरपंच वृषाली निकेश पाटील यांचा सुद्धा शाल,श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा सचिव अमोल पाटील, मनसे शेतकरी सेना उपाध्यक्ष वसीम तडवी, मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष उदय पाटील, योगेश कोळी आणि अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, महिलांच्या सामाजिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाला आपुलकी पूर्वक मान्यता देण्यासाठी व त्यांच्या कर्तव्याची जाणीव लक्षात घेता जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.