महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेजवळ पोलिसांच्या पथकावर हल्ला करत पोलिसाचं अपहरण करण्याचा प्रयत्न !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चोपडा येथे महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात पोलिसाचेच अपहरण झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातपुड्याच्या डोंगर दऱ्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर दोन्ही बाजूला उमर्टी गाव विभागले गेले आहे. गावाचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा नदीच्या पलीकडील भाग मध्यप्रदेशात येतो. उमर्टी गावात अवैध बंदूक, देशी कट्टे बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.अश्याच एका गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला शोधून अटक केल्यानंतर आरोपीच्या नातलगांनी पोलीस कर्मचाऱ्याला पकडून त्याचे अपहरण करून मध्य प्रदेशातील उमर्टी गावात डांबून ठेवले होते .याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. शेषराव नितनवरे, चेतन महाजन, विशाल पाटील, दिपक शिंदे, किरण पारधी यांचे पथक मध्यप्रदेशच्या सिमेलगत असलेल्या उमर्टी गावात गेले होते. या परिसरात शिकलकर जमातीकडून मोठ्या प्रमाणात गावठी कट्टाची तस्करी होत असतेच. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. नाईक शशिकांत पारधी यांना बंदिस्त करून मध्यप्रदेश हद्दीतील उमर्टी गावात बंदिस्त करून ठेवले आहे.
जळगाव पोलिसांनी चार तासांच्या भयानक कामगिरीने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने बंदिस्त पोलीस नाईक शशिकांत पारधी यांना सुखरूप सोडवण्यात यश आले आहे. मात्र पोलीसा वर सुद्धा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे .पोलिसांच्या या प्रयत्नात दोन पोलीस कर्मचारी सहा. पो. नि. शेषराव नितनवरे, शिपाई किरण पारधी हे जखमी झाले आहेत.आरोपी पप्पी सिंग याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिली. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर हे जखर्मीच्या उपचारा प्रसंगी रुग्णालयात उपस्थीत होते.