Monday, March 24, 2025
Homeजळगावमहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मांनवतकर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मांनवतकर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मांनवतकर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात.
वरनगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचेअधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांची प्रचार रॅली आज दिनांक 5/11/2024 रोजी समस्त वरणगावकरांचे ग्रामदैवत असलेल्या भवानी माता मंदिर नारळ फोडून वंदन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली…
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ही रॅली आंबेडकर नगर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले तिरंगा चौक येथे रॅलीचे सांगता करण्यात आली.

 


ठिकठिकाणी राजेश मानवतकर यांचे महिला भगिनींनी यांनी औक्षण केले …तसेच खूप मोठ्या प्रमाणात संख्येने महिलावर्ग तसेच तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी होते.
डॉ मानवत कर यांच्या प्रचारार्थ तळवेल येथे राष्ट्रवादी मेळावा आयोजित केला होता

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या