महावितरण कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महावितरण कंपनीने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या एका कंत्राटदाराला कंत्राट दिला आहे. सदर कंत्राटदाराकडून महावितरण कंपनीला कर्मचाऱ्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु संबधित कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून वेतन अदा केलेले नाही.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,कंत्राटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव महावितर कंपनीच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून त्यांना आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केले व अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली. यावेळी चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, पी.एस.आय योगेश माळी, पी.एस.आय संदिप घुले, गोपनीय पोलीस पंढरीनाथ पवार, भटू पाटील चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी पोलिसांनी आत्मदहन करणारे फिर्यादी महेंद्र पाटील यांच्या हातातून पेट्रोलने भरलेली बाटली हिसकावून सर्व कर्मचारी यांना ताब्यात घेतले. तसेच महावितरण कर्मचारी शाहिद पिंजारी यांना सकाळी ६ वाजता ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते.