महाविद्यालय परिसरात चॉपर घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गणेश कॉलनी भागातील एका महाविद्यालय परिसरात अनधिकृतपणे चॉपर घेऊन, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी फिरत असलेल्या तीन जणांना जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यापैकी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलाला समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील गणेश कॉलनी भागात काही महाविद्यालयीन युवकांकडे कोणतीही परवानगी नसताना हत्यार बाळगत फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस गेले असताना, तीन युवक पोलिसांना येताना पाहून पळून जाण्याच्या तयारीत दिसले. पोलिसांनी तिन्ही युवकांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चॉपर आढळून आला