Wednesday, March 26, 2025
Homeजळगावमहिलांचा सन्मान करणाऱ्या संस्कृतीचे कृतिशील वाहक होऊ या डॉ .किशोर कोल्हे

महिलांचा सन्मान करणाऱ्या संस्कृतीचे कृतिशील वाहक होऊ या डॉ .किशोर कोल्हे

महिलांचा सन्मान करणाऱ्या संस्कृतीचे कृतिशील वाहक होऊ या
डॉ .किशोर कोल्हे
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. आपल्या देशातील थोर संत समाजसेवक आणि महापुरुषांनी महिलांना सन्मान देऊन पुरुषां इतकाच महत्त्वाचा समान घटक मानले आहे. महिलांच्या कुटुंब व समाजातील कृतीशील सहभागाशिवाय देशाची प्रगती होत नाही त्यासाठी महिलांचा सन्मान करणाऱ्या कृतिशील विचारांचे आपण सारे वाहक होऊ या !” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी भालोद येथे केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महिला भगिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .बी. वाघुळदे ,प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे,उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी,राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जतीन कुमार मेढे उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक भगिनींचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे

 

Oplus_131072

.राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्या कडून या भेटवस्तू देण्यात आल्या.विशेष म्हणजे प्रा.डॉ.सुनील नेवे हा उपक्रम गेली सात वर्षे झाले राबवित आहेत.

याप्रसंगी विशेष अतिथी प्राचार्य वाघुळदे यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांचा समाज व देशाच्या विकासातील महत्त्वपूर्ण सहभाग सांगून महिलांनी उच्च शिक्षण घेऊन शासन प्रशासनासह रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी शोधायला हव्यात.
अर्थकारणामध्ये महिलांना त्यांच्यातील चातुर्य, काटकसर व संयमीवृत्ती यशस्वी करीत असते. अनेक क्षेत्रात महिलांनी घेतलेली उंच भरारी त्यांच्या बौद्धिक संपदेसह त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची गाथा सांगते. या महिलांचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील उच्चशिक्षित विद्यार्थिनी आणि महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे असे सांगितले .
महाविद्यालयातील महिला भगिनी प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे,प्रा.डॉ.मोहिनी तायडे,प्रा.हेमलता कोल्हे,प्रा.शैलजा इंगळे,प्रा.जान्हवी इंगळे,प्रा.गीतांजली चौधरी,प्रा.फाल्गुनी राणे,प्रा.भावना प्रजापती,प्रा.कोमल सावळे,श्रीमती मोहिनी चौधरी,सौ.चंद्रकांत लोखंडे यांचा सन्मान केला गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,प्रास्तविक व आभार प्रा.डॉ.जातीनकुमार मेढे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.अजयकुमार कोल्हे,प्रा.डॉ.दिनेश पाटील,प्रा.डॉ.पद्माकर सावळे,प्रा.डॉ.आशुतोष वर्डिकर,प्रा.डॉ.किरण चौधरी,प्रा.डॉ.गणेश चौधरी,प्रा.काशिनाथ पाटील,प्रा.चंद्रकांत वानखेडे,प्रा.डॉ.वसंत पवार ,प्रा.हेमंत इंगळे,प्रा.डॉ.दिनेश महाजन,प्रा.मुकेश पवार,श्री.दिलीप इंगळे,श्री.किशोर चौधरी,श्री.कल्याण चौधरी,श्री.बाळकृष्ण चौधरी,श्री.मुबारक तडवी,श्री.तुळशीराम पाटील,श्री.पंकज नेहेते,श्री.रूपम बेंडाळे.इत्यादींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या