महिला गटविकास अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे कार्यक्षेत्रातील महिला सरपंच व सदस्यांचे आमरण उपोषण सुरू.
यावल दि.१६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालोद सरपंच व सदस्य यांनी ६ ऑगस्ट,२७ सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर २०२४ रोजी अशा एकूण ३ वेळा मालोद ग्रामपंचायत ग्रामसेवका विरुद्ध यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी सौ. मंजुषा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा दखल न घेतल्याने उपसरपंच सैनाज शरीफ तडवी यांच्यासह काही सदस्य व ग्रामस्थांनी आज सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ पासून बेमुदत आमरण उपोषण यावल पंचायत समिती समोर सुरू केले आहे.
यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की,आम्ही मालोद गांवकरी व ग्राम पंचायत सदस्य गृप आमच्या पंचायत मालोद येथील ग्रामसेवक राजु अन्वर तडवी हे गेल्या
७ ते ८ वर्षा पासुन आमच्या गांवात कार्यरत ( एकाच ठिकाणी ठाण मांडून ) आहेत, परंतु ग्रामसेवक तडवी हे यावल येथे वैयक्तीक
खोलीवरून कार्यभार सांभाळत असतात इकडे आम्हाला गांवात समस्या सोडवायला अडचण येते ग्रामसभा व मासिक सभा
घ्यायला सुध्दा टाळाटाळ करत असतात.आम्हाला विश्वासात न घेता कोणतेही निर्णय घेतात
तसेच गांवातील १५ वित्त आयोगाचे कामे करण्यासाठी त्यांच्या संबधातील ठेकेदार यांची निवड करून परस्पर कामांची वाटप
करण्यात येते.गांवात वसुलीसाठी प्रयत्न केले जात नाही.सतत गैरहजर राहतात,फोन केला तर फोन उचलत नाही.फोन उचलला तरी उडवा उडवीचे उत्तर देत असतात.सदयाच्या स्थिती मध्ये ते काय बोलतात तेच समजत
नाही,त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही.तरी कृपया करून राजू अन्वर तडवी यांची त्वरीत बदली करण्यात यावी व त्यांच्या जागी अशरफ तडवी किंवा दिलीप तडवी यांची नियुक्ती आमच्या गृप ग्राम पंचायत मालोदला करण्यात यावी .
आम्ही आता पर्यन्त ०३ वेळा तक्रार अर्ज दिलेले आहेत परंतु आमच्या तकार अर्जावर कोणताही विचार
करण्यात आलेला नाही.म्हणुन आता आम्हाला आमच्या हक्कासाठी नाईलाजाने सर्व ग्राम पंचायत सदस्य व गांवकरी हे यावल
पंचायत समिती कार्यालया समोर दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजे
पासुन आमरण उपोषणास बसणार आहेत यांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आज सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले निवेदनावर उपसरपंच सैनाब शरीफ तडवी, सदस्य आबेदा सिकंदर तडवी,उर्मिला अनिल बारेला,परवीन भिकारी तडवी,मुन्नी जुम्मा तडवी,सलीम अकबर तडवी, भिका निजाम तडवी,इस्माईल रमजान तडवी,या सदस्यांसह इस्माईल रमजान तडवी,समीर सिकंदर तडवी,संजू हुसेन तडवी, सिकंदर बाबू तडवी,शरीफ अकबर तडवी,पठाण जंगलू तडवी,आनमद रमजान तडवी,हाफिसका मेहबूब तडवी,फिरोज जाफर तडवी,सुभान हिम्मत तडवी,हबीब रुबाब तडवी, इस्माईल मेहबूब तडवी,आमद सिकंदर तडवी,भिकारी रज्जाक तडवी,सागर माणिक पाटील,सुरेश दौलत धनगर,नारायण रघुनाथ पाटील यांनी स्वाक्षरी केली आहे.