Monday, March 17, 2025
Homeगुन्हामहिलेचा रस्ता अडवून एकाने केला विनयभंग !

महिलेचा रस्ता अडवून एकाने केला विनयभंग !

महिलेचा रस्ता अडवून एकाने केला विनयभंग !
भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेने फेसबुकवरील फ्रेंड्स रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नाही, या रागातून एकाने तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात ३१ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता संशयित अक्रम शहा हा दुचाकीने आला. व महिलेचा रस्ता अडून म्हणाला की, “मै तुम्हारे फेसबुक पर फ्रेंड रिक्वेस्ट भेजी है, तुम कोई जवाब देती नही, मैने मेसेज डाले है, उसकाभी जवाब तुमने दिया नहीं, असे बोलून महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता संशयित अक्रम शहा (पूर्ण नाव माहित नाही) रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या